
उमेश जाधव यांना कवी उमाकांत कीर स्मृती पुरस्कार प्रदान
पाली, ता. २३ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध तरुण कवी उमेश जाधव यांना नुकताच कवी उमाकांत कीर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातील नामवंत संस्थांमध्ये आघाडीवर असलेल्या कोमसाप या संस्थेकडून साहित्य क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उमद्या कवींना दर वर्षी कवी उमाकांत कीर स्मृती पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार उमेश जाधव यांना देण्यात आला आहे.
प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार कोमसापचे विश्वस्त रमेश कीर यांच्या हस्ते सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात आला. कार्यक्रमाला कोमसापचे विश्वस्तप्रमुख पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर, मौज प्रकाशनच्या संपादिका व लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, रायगडभूषण एल. बी. पाटील, सुधीर शेठ, अ. वि जंगम उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36313 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..