रायगडमध्ये चार्जिंग स्टेशनच्या हालचाली सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडमध्ये चार्जिंग स्टेशनच्या हालचाली सुरू
रायगडमध्ये चार्जिंग स्टेशनच्या हालचाली सुरू

रायगडमध्ये चार्जिंग स्टेशनच्या हालचाली सुरू

sakal_logo
By

प्रमोद जाधव ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ ः पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती, वाहनांमधील धूर व आवाजामुळे होणारे प्रदूषण अशा अनेक समस्यांना पर्याय म्हणून जिल्ह्यातील नागरिकांकडून इलेक्‍ट्रिक वाहनांना पसंती मिळत आहे. दोन तास चार्जिंग केल्यानंतर अगदी कमी खर्चात ८० ते १०० किलो मीटरचा प्रवास सहज करता येतो. त्यामुळे जिल्ह्यात एक हजारापेक्षा अधिक इलेक्‍ट्रिक वाहने खरेदी करण्यात आली आहेत. चार्जिंग स्टेशनचा प्रश्नही लवकरच सुटणार आहे. जिल्ह्यात माणगाव, पाली, व पेणमध्ये चार्जिंग स्टेशन बसविण्यासाठी प्रस्ताव दाखल झाले असून लवकरच ते सुरू होतील.
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलच्या वाहनांपेक्षा विजेवर चालणाऱ्या वाहनांना अधिक पसंती दाखविली जात आहे. अनेक तरुण, मध्यम वयोगटातील मंडळी विजेवर चालणारी वाहने खरेदी करण्यावर भर देत आहेत. परंतु सध्या चार्जिंग स्टेशनची सुविधा नसल्याने घरच्या घरीच वाहने चार्जिंग करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
पर्यावरण पूरक इलेक्‍ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेत, वाहनधारकांना चार्जिंगची व्यवस्था सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी पुढाकार घेत रायगड जिल्ह्यातील महावितरण कंपनीने इलेक्‍ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनसाठी मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लागणारे नवीन कनेक्शन विद्युत वितरण कंपनीकडून दिले जाणार आहे. ज्या पद्धतीने नवीन मीटर कनेक्शन दिले जातात, त्यानुसार चार्जिंग स्टेशनसाठी नवीन कनेक्शन दिले जाणार आहेत.
जिल्ह्यात माणगाव व पेणमधून प्रत्‍येकी एक, पालीमधील दोन असे एकूण चार ठिकाणी चार्जिंग स्टेशनच्या मान्यतेसाठी महावितरण कंपनीकडे प्रस्ताव दाखल झाले असून पुढील प्रक्रियाही महावितरण कंपनीने सुरू केली आहे. जिल्ह्यात चार्जिंग स्टेशन सुरू होणार असल्याने विजेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी कार्यालयात चार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या स्टेशनच्या ठिकाणी लागणारी केबल व अन्य विद्युत यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता दिली जाणार असून याबाबत पुढील प्रक्रिया सुरू आहे.
- आय. एस. मुलाणी, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी

पेण उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आतापर्यंत विजेवर चालणाऱ्या ९५७ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यात ९०० दुचाकी, ५१ कार, ३ तीन चाकी परिवहन वाहन व ३ ई-परिवहन वाहनांचा समावेश आहे.
- महेश देवकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36337 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top