जीवनविद्या मिशनच्या वतीने ग्रामसमृद्धी अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनविद्या मिशनच्या वतीने ग्रामसमृद्धी अभियान
जीवनविद्या मिशनच्या वतीने ग्रामसमृद्धी अभियान

जीवनविद्या मिशनच्या वतीने ग्रामसमृद्धी अभियान

sakal_logo
By

कर्जत, ता. २६ (बातमीदार) ः गावातील प्रत्येक कुटुंब, व्यक्ती सुखी व्हावी, यासाठी आम्ही जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून कार्य करणार आहोत. त्यादृष्टीने आम्ही या भिवपुरी गावाचा अभ्यास केला आहे, अशी भावना जीवनविद्या मिशनचे विश्वस्त आनंद राणे यांनी व्यक्त केली. राज्यातील दहा गावे निवडली आहेत. या गावांत संस्कार शिक्षण अभियान राबवायचे असून त्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीची अपेक्षा असल्याचे राणे म्हणाले.

तालुक्यातील वैजनाथ परिसरात असलेल्या सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनच्या वतीने भिवपुरी गावामध्ये ग्रामसमृद्धी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने एका विशेष समारंभाचे आयोजन येथील श्री दत्त मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते. गावाच्या सुरुवातीलाच असलेल्या नामफलकाचे अनावरण सरपंच संगीता माळी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच हरिश्चंद्र मिसाळ, जीवनविद्या मिशनचे विश्वस्त मधुकर सरोदे, डोंबिवली शाखा सचिव सुमित शिगवण, प्रकाश कदम, कोंकण ज्ञानपीठ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे, प्रा. शिशुपाल बोधले, विजय मांडे, सचिन मुने, प्रवीण वाडला आदी उपस्थित होते.

डोंबिवली शाखेच्या वृषाली दळवी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, या गावातील मुलांना संस्कारक्षम शिक्षण देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. त्यांच्यामध्ये कृतज्ञता भाव निर्माण व्हावा म्हणून आम्ही विविध उपक्रम करणार आहोत. महिला, शेतकरी, ग्रामस्थ यांची उन्नती कशी होईल यासाठी आम्ही जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून कार्य करणार आहोत. याप्रसंगी प्रशांत आचार्य, राजू शिगवण, लीलाधर किल्लेदार, प्रकाश सोळंकी, प्रल्हाद तुपे, दीपक सोळंकी, गुलाब भोसले, प्रमिला गायकवाड, सुश्मिता बार्शी, रेखा गोरे, मेघाली शिगवण, सुनिता किल्लेकर, शुभांगी मंचेकर, अनिता मुंज, श्रुती पालव, नम्रता पालव, सुचिता शेडगे, विद्या बोडस आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36347 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..