
दरडग्रस्त शेणवई गावात बांधणार संरक्षण भिंत
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २७ : तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे रोहा तालुक्यातील शेणवई येथील डोंगरभागातील ४० घरांना धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मौजे शेणवई (डोंगरी) येथील डोंगराच्या खचलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळाली असून त्यासाठी राज्य शासनाने एक कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून हा निधी खर्च केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. मौजे शेणवाईमध्ये (डोंगरी) २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरभाग कोसळल्याने डोंगरावरील ३० घरांना व शेणवाई गावामधील १० घरांना धोका निर्माण झाला होता. ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी शेणवई (डोंगरी) येथील डोंगराच्या खचलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याकरिता प्रशासकीय मान्यता व सदर कामासाठी एक कोटी ३८ लाख ४८ हजार ३९८ रुपयांचा निधी मंजुरीसाठी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. यास
संरक्षण भिंतीमुळे शेणवई गावात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये घट होणार असल्याची आशा येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36361 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..