जिल्हा नियोजनाची सभा तहकूब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा नियोजनाची सभा तहकूब
जिल्हा नियोजनाची सभा तहकूब

जिल्हा नियोजनाची सभा तहकूब

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २७ : जिल्हा नियोजनाची आजची सभा अखेर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना तहकूब करावी लागली. या सभेला आम्ही उपस्थित राहू शकत नसल्याचे पत्र शिवसेनेसह भाजप, शेकापच्या सदस्य आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ही सभा घेऊ नये, अशी मागणी केली होती. शिवसेनेचे जिल्ह्यातील तीनही आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटी येथे असल्याने त्यांना सभेला उपस्थित राहता येणार नव्हते. यात शिवसेनेच्या आमदारांना भाजपने साथ दिल्याने राष्ट्रवादी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ही सभा कोरमअभावी तहकूब करावी लागली.
सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये विकास कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. त्यामुळे महत्त्वाचे आदेश, सभा घेण्याचे सातत्य महाविकास आघाडीच्या सरकारने सुरू ठेवले आहे. त्‍यानुसार पूर्वनियोजित रायगड जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवारी (ता. २७) अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवनात घेण्यात येणार होती. या सभेची निमंत्रणे सर्व सदस्यांना पाठवण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. त्‍यामुळे ही सभा तहकूब करण्याचा निर्णय पालकमंत्री तटकरे यांनी घेतला. अचानक रद्द झालेल्या या सभेला खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासह जिल्ह्यातील खात्याचे विभागप्रमुख, महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा नियोजनची सभा रद्द झाल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांसह डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाची बैठक घेऊन पालकमंत्र्यांनी कामांचा आढावा घेतला.

***
सदस्य संख्या कमी असल्याने ही सभा तहकूब करावी लागली. पुढे पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार ही सभा होईल. जिल्हा नियोजनच्या सर्व सदस्यांना वेळेत उपस्थित राहण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या; परंतु पुरेशा संख्ये इतके सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत.
- जयसिंग मेहेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36378 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..