पावसाअभावी तयार झालेली भात रोपे संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाअभावी तयार झालेली भात रोपे संकटात
पावसाअभावी तयार झालेली भात रोपे संकटात

पावसाअभावी तयार झालेली भात रोपे संकटात

sakal_logo
By

भाताची रोपे संकटात
जिल्ह्यात अनेक तालुक्यांत असमाधानकारक पाऊस
पाली, ता. २७ (वार्ताहर) : जिल्ह्यात वरुणराजा उशिराने दाखल झाला. त्यातच अनेक तालुक्यांत पावसाने दडी मारली आहे. विविध तालुक्यांत पावसाचे प्रमाणही असमाधानकारक आहे. अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील तयार झालेली भात रोपेही संकटात सापडली आहेत.
जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील १६ तालुके मिळून सोमवारपर्यंत (ता. २६) सरासरी २२२.३४ मिमी पाऊस झाला आहे. त्यामध्ये सर्वांत कमी सुधागड १२४.२४ मिमी, तर सर्वाधिक पाऊस श्रीवर्धन ५७२.०० मिमी इतका झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसामध्ये मोठी तफावत आहे. ज्या तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. तेथील शेतकरी चिंतातुर झाले आहेत. रोहा येथील एका शेतकऱ्याने दडी मारलेल्या पावसावर कविताही लिहिली आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिमी)
सुधागड १२४.२४ (सर्वांत कमी)
पोलादपूर १२४.७०
रोहा १२८
पनवेल १२९.८०
उरण १४४
माणगाव १५२
महाड १५४
पेण १५७
कर्जत १५८.५०
श्रीवर्धन ५७२.०० (सर्वाधिक)
अलिबाग ३३६.००
माथेरान ३३०.१०
मुरूड ३१९.००
खालापूर २६६.००
म्हसळा २६४.००
तळा २०१.००
सरासरी ९४१.५६

शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात पाऊस पडल्यावर रोहू पद्धतीने बियाणे पेरावे. हळव्या किंवा कमी कालावधीच्या बियाण्यांचा वापर करावा.
- उज्‍ज्वला बाणखेळे, रायगड जिल्हा कृषी अधीक्षक, अलिबाग

पावसाअभावी भातरोपांची वाढ खुंटू नये, यासाठी रोपवाटिकांना पर्यायी पाण्याची किंवा सिंचनाची व्यवस्था करावी. तसेच ज्या ठिकाणी सिंचन सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी रोपवाटिकांना झारीने दिवसातून किमान एकदा पाणी द्यावे. पाऊस सुरू होताच रोपांची वाढ जोमदार होण्यासाठी शिफारशीनुसार खत मात्रा देण्यात यावी.
- दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक, अलिबाग, रायगड

आत्तापर्यंत पाऊस खूप कमी पडला आहे. पडलेल्या पावसावर भाताची रुजवण चांगली झाली आहे. रोपेही मोठी झालीत; मात्र पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्याने चिंता वाटत आहे.
- मालू कोकरे, शेतकरी, सुधागड

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36379 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..