शिंदे समर्थकांचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे समर्थकांचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन
शिंदे समर्थकांचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन

शिंदे समर्थकांचे अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : अलिबागचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. भर पावसात अलिबाग, मुरूड तालुक्यातील महिलांसह आलेल्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा अन्याय कधीही खपवून घेणार नसल्याचे खडसावून सांगितले.
शरद पवार हे कधीही आमचे नेते होऊ शकणार नाहीत, असे सांगत सहा महिन्यांपूर्वी माजी खासदार अनंत गीते यांनीच येथील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची पेरणी केली होती. तेव्हापासून शिवसेना कार्यकर्त्यांचा असंतोष दाबून होता, त्यास एकनाथ शिंदे यांनी वाट करून दिल्याचा उल्लेख उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात केला.
चेंढरे बायपास येथील शिवसेना कार्यालयासमोर अलिबाग, मुरूड, रोहा तालुक्यातील शिंदे समर्थक एकवटले होते. आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी पक्षप्रतोद मानसी दळवी, शिवसेनेचे बडतर्फ तालुका अध्यक्ष राजा केणी, अॅड. सुशील पाटील, अॅड. मनोज शिंदे यांनी भाषणे केली. दरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मुसळधार पाऊस पडत असतानाही शिंदे समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. जिल्ह्यातील शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णपणे हायजॅक केली होती, तिला मुक्त करण्यासाठी हे बंड असून शिवसेनेच्या हितासाठी सर्वांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन देण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना करण्यात केले. जिल्ह्यातील तीनही बंडखोर आमदारांना येथील नागरिकांचा समर्थन असल्याचे दाखवण्यासाठी शिंदे समर्थकांनी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केल्‍याचेच दिसून आले.

पोलिस बंदोबस्तात वाढ
शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक अशा दोन्ही गटाच्या मंगळवारी अलिबागमध्ये सभा होत असल्याने अलिबागमध्ये येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिस बंदोबस्तात सोमवारी रात्रीपासूनच वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर सभास्थानी जाणारे मार्ग बॅरिगेट्स टाकून अडविण्यात आले आहेत. रात्रीपासूनच पोलिस अलर्टमोडवर असून अलिबाग शहरात येणाऱ्या वाहनांवर नजर ठेवून असल्याची माहिती अलिबागचे पोलिस निरिक्षक शैलेश सनस यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36390 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top