पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची खरी जागा दाखवून देऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Public protest meeting of Shiv Sainiks in Pali Raigad
पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना खरी जागा दाखवू

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना खरी जागा दाखवू

पाली - पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची खरी जागा दाखवून देऊ. जिल्ह्यातील स्थानिक आमदारांना पराभवाचे पाणी पाजू, अशा शब्दांत शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांच्या नेतृत्वाखाली पाली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी (ता. २८) जाहीर निषेध सभा झाली. त्‍यावेळी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

शिवसेनेशी गद्दारी करून आपल्यासह इतर आमदारांना आसाम, गुवाहाटी येथे पळून घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचा, तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले यांचा शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला. शिवसेनेच्या ताकदीवर निवडून येणाऱ्या रायगडातील तीनही आमदारांना आगामी निवडणुकांमध्ये पराभवाचे पाणी पाजू. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची खरी जागा दाखवून देऊ, असे प्रतिपादन जैन यांनी केले. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी पाली शहरात निषेध मोर्चा काढून गद्दारांचा निषेध केला.

''शिवसेना अंगार है, एकनाथ शिंदे भंगार है!'' उद्धवसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! या घोषणा देण्यात आल्या. तसेच बंडखोरांना राजीनामे देऊन निवडणुकीत उतरण्याचे आव्हान करणारे फलक झळकवण्यात आले. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, सुधागड तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख, माजी जिल्हा प्रमुख विष्णभाई पाटील, राजेंद्र राऊत, नगरसेवक सचिन जवके, किशोर खरीवले, सचिन डोबले, आशीष यादव यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण, वाहतूक सेनचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36399 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top