गद्दारांना फेकून देण्याची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गद्दारांना फेकून देण्याची वेळ
गद्दारांना फेकून देण्याची वेळ

गद्दारांना फेकून देण्याची वेळ

sakal_logo
By

अलिबाग, ता. २८ (बातमीदार) ः बाळासाहेबांनी मराठी माणसासह हिंदुत्वासाठी ५६ वर्षांपूर्वी शिवसेना उभी केली. या देशाच्या व महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी भारतीय सेना आणि शिवसेना या दोनच सेना राहिल्या. शिवसेनेच्या अंगावर येण्याचा प्रयत्न कराल, तर फटके बसतील. हे बंडखोर आमदार दलाल आहेत. पैशांसाठी आले आणि पैशांसाठी गेले. या गद्दारांना मातीतून उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. ते पुन्हा उभे राहिले नाही पाहिजे, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. २८) रोजी शिवसेना मेळाव्यात केली.

या वेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, बबन पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, अनिल नवगणे, सह संपर्कप्रमुख किशोर जैन, अलिबाग तालुकाप्रमुख महेश गुरव, शीतल म्हात्रे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राऊत म्हणाले, दि. बा. पाटील फक्त आगरी-कोळ्यांचे नेते नाहीत; तर कष्टकरी जनेतेचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नेते होते. त्यांना एका समाजापुरते मर्यादित ठेवू नका. पुढे ते म्हणाले, चार दिवसांपूर्वी महेंद्र दळवी यांना फोन केला होता. कुठे आहात म्हणून विचारले तर पायाचे ऑपरेशन झाले. आराम करायला आलो असे ते म्हणाले. महेंद्र दळवीने काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप त्यानंतर शिवसेना असे अनेक पक्ष बदलले आहेत. सर्वच गोठ्यांतले शेण खाऊन आलेला हा बैल आहे. आता बैल बदलण्याची वेळ आली आहे. राज्यात शिवसेना संपवण्याचे कारस्थान आहे. बंडखोर आमदारांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असेही राऊत म्हणाले.
---
दळवींना पक्ष बदलण्याची सवय
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अनेक वेळा स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलले आहेत. त्यांना पक्ष बदलण्याची सवय आहे. अशा आमदारांना पुन्हा निवडून द्यायचे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36401 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top