उकरूळमध्ये प्रशिक्षण शिबिरात शेतकऱ्यांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उकरूळमध्ये प्रशिक्षण शिबिरात शेतकऱ्यांचा सहभाग
उकरूळमध्ये प्रशिक्षण शिबिरात शेतकऱ्यांचा सहभाग

उकरूळमध्ये प्रशिक्षण शिबिरात शेतकऱ्यांचा सहभाग

sakal_logo
By

कर्जत, ता. २९ (बातमीदार) : तालुक्यातील उकरूळ गावातील शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्ताने झालेल्या प्रशिक्षण शिबिरात गावातील ३५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
उकरूळ ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेती करावी आणि शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व्हावे, यासाठी कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन सरपंच वंदना थोरवे यांनी केले होते. या वेळी तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, अनुराधा अंधारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी शेवाळे यांनी शेतकऱ्यांना भातपिकाच्या लागवडीसाठी योग्य तंत्रज्ञान आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन केले. तर, भातपिकाच्या लागवडीसाठी एसआरटी पद्धत, चारसूत्री लागवड पद्धत, ड्रम सीडर पद्धत, यंत्राद्वारे लागवड पद्धत अशा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अशी सूचना केली. भातपिकाचे उत्पादन वाढवावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36408 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..