मतदार संघात बंडखोर आमदार सक्रिय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार संघात बंडखोर आमदार सक्रिय
मतदार संघात बंडखोर आमदार सक्रिय

मतदार संघात बंडखोर आमदार सक्रिय

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६ : दहा दिवस धावपळीत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार मतदारसंघात परतले असून महाडचे आमदार भरत गोगावले यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. सोमवारी कशेडी घाटात कोसळलेल्या दरडग्रस्त भागापासून गोगावले यांनी पाहणी केली. पावसाचा जोर वाढल्यानंतर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडताच शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजार पेठेतील बहुसंख्य व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केला.
महाड नगरपालिका क्षेत्रात तीन वेळा धोक्याचा भोंगा वाजवण्यात आला होता. पुरापासून संरक्षण करण्यासाठी अनेकांनी आपली वाहने मुंबई-गोवा महामार्गावर सुरक्षित ठिकाणी उभी करून ठेवली आहेत. याचबरोबर मंगळवारी सकाळी दासगाव भोई वाड्यातील अर्जुन अप्पा पड्याळ यांच्या घरावर भिंतीचा कठडा कोसळल्याने घराचे नुकसान झाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे दासगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची पाहणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे महेंद्र थोरवे यांनी आपल्या कार्यालयातून आपत्‍कालीन परिस्थितीचा आढावा घेतला.

जिल्ह्यात झालेले नुकसान
नादुरुस्त रस्ते - ४
स्थलांतरित व्यक्ती- १७१६
मदत केंद्र- २६
पडलेली पक्की घरे -३
नुकसानग्रस्‍त कच्ची घरे- १४
पडलेली झोपडी -१
पशुधन हानी- १
सार्वजनिक मालमत्तेची हानी- १

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36519 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..