कुर्बानी नाही तर रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुर्बानी नाही तर रक्तदान
कुर्बानी नाही तर रक्तदान

कुर्बानी नाही तर रक्तदान

sakal_logo
By

पाली, ता. ९ (वार्ताहर) : समाजात काही थोडे लोक आपल्या विचारांना कृतीची जोड देतात. कृतीतून प्रबोधन घडवतात. माणगाव तालुक्यातील अभियंता नासिर वल्लाद हे त्यातीलच एक आहेत. मागील २१ वर्षे बकरी ईदनिमित्त त्यांनी रक्तदान केले आहे. अगदी कोरोनाकाळातही बकरी ईदच्या दिवशी त्यांनी रक्तदान केले.
नासिर यांच्या घरात बकरी ईदनिमित्त कुर्बानी दिली जात नाही. त्यांच्या घरी सर्वधर्मीय बांधव येतात आणि शुभेच्छा देतात. नासिर हे अपघातग्रस्तांच्या मदतीलाही नेहमी धावून येतात. बकरी ईद व्यतिरिक्तही त्यांनी अनेकदा रक्तदान केले आहे. समाजातील कालबाह्य रूढी परंपरा सोडून दिल्या पाहिजेत, असे नासिर यांचे मत आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या पत्नीला व मुलीला कधीही हिजाब घालू दिला नाही. अशा प्रकारे नासिर यांनी एक विधायक व पुरोगामी पाऊल उचलून आदर्श घालून दिला आहे. नासिर हे ४९ वर्षांचे असून मागील वर्षी त्यांना थायरॉईडच्या आजाराने ग्रासले. तसेच इतरही शारीरिक व्याधींमुळे त्यांना रक्तदान करणे शक्य होत नाही. मात्र, तब्बल २१ वर्षे त्यांनी बकरी ईदच्या निमित्ताने दिलेला कृतीयुक्त विधायक संदेश अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36557 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..