गावाच्या सुरक्षेची जबाबदार ग्राम रक्षक सुरक्षा दलावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावाच्या सुरक्षेची जबाबदार ग्राम रक्षक सुरक्षा दलावर
गावाच्या सुरक्षेची जबाबदार ग्राम रक्षक सुरक्षा दलावर

गावाच्या सुरक्षेची जबाबदार ग्राम रक्षक सुरक्षा दलावर

sakal_logo
By

अलिबाग, ता. १० : पोलिस यंत्रणा प्रत्येक गावाला सुरक्षा देऊ शकत नाही. यासाठी आपले गाव हे तरुणांनी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी उचलणे महत्त्वाचे आहे. यासाठी ग्रामरक्षक सुरक्षा दल पोलिस विभागाकडून प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत स्थापन केले जात आहे. हे दल गावात पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करणार आहे. अलिबाग पोलिस ठाणे हद्दीत ग्राम रक्षक सुरक्षा दल स्थापन करण्याचा पहिला मान हा मापगाव गावाला मिळाला आहे. गावातील १५ होतकरू तरुण या दलात सामील झाले आहेत.

मापगाव ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात अलिबाग पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या हस्ते ग्राम रक्षक सुरक्षा दलातील १५ सदस्यांना ओळखपत्र आणि टी शर्टचे वाटप करण्यात आले. मापगावच्या सरपंच अनिता थळे, पोलिस पाटील बहिरोळे, माजी सरपंच सुनील थळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ग्राम रक्षक सुरक्षा दलाची कर्तव्ये याबाबत मोलाचे मार्गदर्शन करून आपत्ती कालावधीत नेहमी सतर्क राहून पोलिस ठाण्याच्या संपर्कात राहण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांनी दलाला दिल्या आहेत. ग्राम रक्षक सुरक्षा दल हे गावाच्या सुरक्षेबाबत काम करणार आहे. नैसर्गिक आपत्ती काळात हे दल बचाव, मदत कार्यात सहभागी होईल. गावातील गुन्ह्यांबद्दल पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करतील. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या दलाचे सदस्य मदतीसाठी पुढे येतील.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36571 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..