कर्जतमध्ये आषाढी एकादशी उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जतमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
कर्जतमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

कर्जतमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

sakal_logo
By

कर्जत, ता.१० (बातमीदार) ः कर्जत तालुक्यात सुमारे पन्नास गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला या बहुसंख्य गावातील ग्रामस्थ पंढरपूर आणि आळंदीला जात असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. काही शाळांमधील विद्यार्थी संतांचा पेहराव करून ताल धरत कपालेश्वर मंदिरातील विठ्ठल रखुमाई मंदिरात आले आणि त्यांनी हरीनामाचा गजर केला. दोन वर्ष कोरोनाच्या संकटात चिमुरड्यांची दिंडी निघाली नव्हती. म्हणून यंदा वेगळाच उत्साह त्यांच्यामध्ये होता.

कर्जत शहरातील विठ्ठल मंदिरातील पुजेचा मान नगरसेविका मधुरा चंदन आणि महेंद्र चंदन या उभयतांना मिळाला होता. पहाटे त्यांच्याकडून पुरोहित जनार्दन परांजपे यांनी षोडोपचार पूजा करू घेतली. कर्जत शहरातील शिशुमंदिर, विद्या विकास मंदिर, शारदा मंदिराच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले. या सर्व दिंड्या कपालेश्वर मंदिरात भजनाच्या तालावर आल्या. यावेळी शिक्षिकांनी सुद्धा ताल धरला होता. दहिवलीच्या पुरातन विठ्ठल मंदिरात असंख्य भाविकांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावोगाव विठ्ठल मंदिरात असंख्य भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36585 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..