पथनाट्यातून स्वच्छतेबाबत जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथनाट्यातून स्वच्छतेबाबत जनजागृती
पथनाट्यातून स्वच्छतेबाबत जनजागृती

पथनाट्यातून स्वच्छतेबाबत जनजागृती

sakal_logo
By

अलिबाग, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून स्वच्छता पंधरवडा अभियान सुरू करण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून पथनाट्य घेण्यात आले. त्याद्वारे कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१ ते १५ जुलै या कालावधीत स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले. या अभियानातून विविध प्रकारचे लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. कंपनीच्या माध्यमातून प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने मेरा भारत, स्वच्छ भारत हे पथनाट्य घेण्यात आले. या पथनाट्यातून स्वच्छता, प्लास्टिक बंदी, कोविड लसीकरण यांसह विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. या वेळी कंपनीचे अनुप गुप्ता, एस. सी. रे, वीरेंद्र कुमार, कासिवेल राजन, जितिन सक्सेना, अतुल दलाल, एलविना आईजक, तपस्वी गोंधळी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पथनाट्यात विनोद नाईक, विजय शिंदे, सुचित जावरे, प्रसाद अमृते, श्रेया पाटील, मानसी पाटील, पूर्वा नाईक, समृद्धी पाटील, अधिक कलाकार सहभागी झाले होते. या सर्व कलाकारांचा व प्रिझम संस्थेचा कंपनीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36610 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..