वारे तलाठी कार्यालय वर्षभरापासून बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारे तलाठी कार्यालय वर्षभरापासून बंद
वारे तलाठी कार्यालय वर्षभरापासून बंद

वारे तलाठी कार्यालय वर्षभरापासून बंद

sakal_logo
By

कर्जत, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील वारे गावातील तलाठी कार्यालय वर्षभरापासून बंद आहे. हे कार्यालय कळंब येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सात ते आठ किलोमीटरची पायपीट किंवा रिक्षा करत कळंब गाठावे लागत आहे. ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी कार्यालय वारे गावात पुन्हा सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वारे तलाठी सजा अंतर्गत वारे, पोशिर, मानकीवली, देवपाडा, पोही, कुरुंग, चिंचवाडी, या सात महसूल गावांसह परिसरातील वाड्या पाड्या येतात. हे तलाठी कार्यालय एका खासगी जागेत होते. या कार्यालयाची वास्तू मोडकळीस आल्याने त्याला तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालय कळंब येथे हलवले. त्यामुळे या परिसरातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना कळंब कार्यालय गाठावे लागते. त्यातच काही वेळेस तलाठी अन्य कामांमुळे कार्यालयात नसल्यास परत माघारी फिरावे लागते. यात शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा वेळ वाया जातो. सातबारा उतारे, विविध शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी वेळोवेळी लागणारे दाखले, ज्येष्ठ नागरिकांचे दाखले याच  कार्यालयातूनच दिले जातात. मागील वर्षभरापासून हे कार्यालय कळंब येथे हलवल्याने अनेकांची गैरसोय होत आहे.
------------------------------------------------------------------------
वारे गावातील तलाठी कार्यालयाला जागा उपलब्ध नसल्याने काही वर्षांपासून कळंब येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होते; मात्र आता कार्यालयासाठी वारे बौद्धवाडा येथे जागा उपलब्ध केली आहे. त्यासंबंधी ठरावही ग्रामपंचायतीकडून दिला आहे. पुन्हा कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- योगेश राणे, सरपंच, वारे ग्रुप ग्रामपंचायत

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36627 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..