
पाणी गळतीमुळे एसटीत छत्रीचा आधार
अलिबाग, ता. १२ (बातमीदार) : अलिबागकडून रोहाकडे संध्याकाळी निघालेल्या एसटी बसमध्ये पावसाचे पाणी गळत होते. या पाण्यापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रवाशांना छत्रीचा आधार घेण्याची वेळ आली. एसटी महामंडळाच्या या कारभाराचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारीही संध्याकाळी पाऊस बरसत होता. अलिबाग स्थानकातून सायंकाळी ६.१५ च्या सुमारास रोहाकडे एसटी बस प्रवाशांना घेऊन निघाली. या एसटीमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह खासगी, सार्वजनिक संस्थांमध्ये काम करणारे काही कर्मचारी होते. तर काही घरकाम करणाऱ्या महिला प्रवासी होत्या. प्रवाशांनी एसटी पूर्ण क्षमतेने भरली होती. मात्र, रोहाकडे जाताना पावसाचा जोर अचानक वाढला. त्यामुळे बसमध्ये पाण्याची गळती सुरू झाली. अचानक पावसाचे पाणी अंगावर पडू लागल्याने प्रवासी हैराण झाले. काही प्रवाशांनी छत्रीचा आधार घेत पाणी गळतीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. एसटी महामंडळाच्या या कारभाराबाबत अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36641 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..