
जमीन परत मिळण्यासाठी राज्यपालांना साकडे
जमीन परत मिळण्यासाठी राज्यपालांना साकडे
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : अलिबाग तालुक्यातील रेवस-आवरे पोर्ट प्रकल्पासाठी भूमिपुत्रांनी अत्यंत विश्वासाने रोजगार निर्मिती आणि औद्योगिकरणाला चालना मिळावी या उद्देशाने सुमारे १२०० हून अधिक एकर जमीन वीस वर्षापूर्वी दिली. परंतु येथे कोणताही प्रकल्प आला नाही. ही जमीन परत मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी राज्यपालांना साकडे घातले.
एमआयडीसीने या जमिनी घेतल्यानंतर प्रकल्प राबवला नाही. त्यामुळे शेतीची डागडुजी न झाल्याने
जमिनीमध्ये खारेपाणी शिरू लागले आहे. यामुळे येथे भात पीक घेणे शक्य होत नाही, असे शेतकरी परशुराम म्हात्रे यांनी सांगितले. खारेपाणी शिरल्याने शेती नापिक झाल्या आहेत. कामही नाही, रोजगारही नसल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. या भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि जमिनी पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या नावे व्हाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवार भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेत निवेदन दिले. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे, अनंत जाधव, सुजित गावंड, मनोज म्हात्रे, रतिकांत पाटील, रमाकांत म्हात्रे, सचिन डाकी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36643 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..