अंबा नदीच्या पुरातून गुराखी, १९ बकऱ्यांची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबा नदीच्या पुरातून गुराखी, १९ बकऱ्यांची सुटका
अंबा नदीच्या पुरातून गुराखी, १९ बकऱ्यांची सुटका

अंबा नदीच्या पुरातून गुराखी, १९ बकऱ्यांची सुटका

sakal_logo
By

अलिबाग, ता. १३ (बातमीदार) : नागोठण्याजवळ चिकणी गावाच्या परिसरातील अंबा नदी किनाऱ्यालगत बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या व पुराच्या पाण्यात अडकलेला ५५ वर्षीय गुराखी संदीप निवर याच्यासह १९ बकर्‌या व कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यास यश आले.
चिकणी येथील रेल्वे पुलाजवळ अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मोहन राठोड यांच्याकडे कामाला असलेला गुराखी संदीप नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ११ वाजता अंबा नदीकिनारी १९ बकऱ्या व एक कुत्र्यासह गेला होता. सखल भागात बकऱ्या चारत असताना दुपारी अंबा नदीचे पाणी अचानक वाढल्‍याने आजूबाजूच्या शेतात शिरले. त्‍यामुळे संदीप यांनी बकऱ्यांसह एक बंद घरात आसरा घेतला. याबाबत बचाव पथकाला माहिती मिळताच सायंकाळी पावणे सातच्या सुमारास गुराखी व बकऱ्यांची सुटका केली. मोहिमेत नागोठण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद पाटील, गणेश भोईर, नीतेश पाटील, सत्यवान पिंगळे आदींसह कोलाड येथील महेश सानप यांच्या वाईंडर वेस्ट अॅडव्हेंचर रेस्क्यू पथकाने बचाव कार्यात मदत केली.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36644 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top