भालगुल पुलाची एक बाजू खचली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भालगुल पुलाची एक बाजू खचली
भालगुल पुलाची एक बाजू खचली

भालगुल पुलाची एक बाजू खचली

sakal_logo
By

पाली, ता. १३ (वार्ताहर) : अतिवृष्टीमुळे पाली-खोपोली राज्य महामार्गावर बुधवारी (ता. १३) भालगुल गावाजवळील पुलाची एक बाजू खचली आहे. त्यामुळे येथे दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे.
खोपोली बाजूकडून पालीकडे येताना भालगुल पुलाच्या सुरुवातीलाच उजव्या बाजूची माती, स्लॅबचा तुकडा व थोडा डांबरी भाग खचला आहे. त्यामुळे पुलाला आधार देणाऱ्या खांबाची बाजू कमकुवत झाला आहे. पूल व रस्ता यामध्ये खड्डा पडून अपघाताचा धोका वाढला आहे. या घटनेची माहिती मिळताच सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार व एमएसआरडीसी उपअभियंता सचिन निफाडे यांनी पुलाची पाहणी केली. तसेच खचलेल्या बाजूकडील मार्गावर व लोखंडी खांब व रिफ्लेक्टर पट्ट्या लावून पुलावरील या बाजूची वाहतूक बंद केली असून वाहतूक पुलाच्या एका बाजूने सुरू ठेवली आहे.

पुलाची पाहणी करण्यात आली असून, योग्य त्या सुरक्षात्मक उपाययोजना केल्या आहेत. हा पूल धोकादायक असण्याची शक्यता नाही. तरीही पुन्हा एकदा पाहणी करण्यात येईल.
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36663 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..