अलिबागमध्ये ठिकठिकाणी नो पार्किंग फलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबागमध्ये ठिकठिकाणी नो पार्किंग फलक
अलिबागमध्ये ठिकठिकाणी नो पार्किंग फलक

अलिबागमध्ये ठिकठिकाणी नो पार्किंग फलक

sakal_logo
By

अलिबाग, ता. १८ (बातमीदार) : अलिबाग शहरात काही सरकारी कार्यालयाच्या आवारात, तर काही कार्यालयासमोरील रस्त्याच्या बाजूला वाहन पार्किंग करण्यास बंदी घातली जात आहे. शहरात ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन कुठे उभे करायचे, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. शहरातील ठिकठिकाणच्या नो पार्किंगच्या फलकांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले स्थळ म्हणून अलिबागकडे पाहिले जाते. तसेच, येथे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपवनसंरक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा कारागृह, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा सामान्य रुग्णालय, नगर परिषद, शाळा, महाविद्यालय अशी अनेक कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये नागरिकांची कामानिमित्त नेहमी वर्दळ असते. सरकारी कार्यालये नागरिकांनी नेहमी गजबजलेली असतात. अलिबागमधील समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांची सुटीच्या दिवशी मोठी गर्दी असते. त्यामुळे शहरात दुचाकीसह तीन चाकी, चारचाकी व अन्य वाहनांची वर्दळ वाढली आहे. सद्यस्थितीत ही वाहने उभी कुठे करायची, असा प्रश्न वाहन चालकांसमोर निर्माण झाला आहे.
काही सरकारी कार्यालयाच्या आवारात वाहने उभी करून दिली जात नाही. रस्त्याच्या बाजूला नो पार्किंगचे बोर्ड लावले जात आहेत. सरकारी यंत्रणेच्या या भूमिकेचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शहरात जागेअभावी वाहन पार्किंगचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे सरकारी कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना पार्किंगवर बंदी घातली जात आहे. शहरात ठिकठिकाणी नो पार्किंगचा फलक लागल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. यातून त्यांना कधी सुटका मिळेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सुटीच्या दिवसात जिल्हाधिकारी, कोर्ट रोड या परिसरात शुकशुकाट असतो. मात्र, बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे अलिबागमध्ये रहदारी वाढली आहे. ही रहदारी नियंत्रणात येण्यासाठी पार्किंगची ठराविक ठिकाणे करण्यात येणार आहेत. यासाठी बुधवारी संबंधित महसूल विभागाचे अधिकारी, नगर रचना विभागाचे अधिकारी यांसह अलिबागमधील पत्रकारांची बैठक घेतली जाईल. यामध्ये पार्किंग स्लॉट, बेशिस्त पार्किंगसंदर्भात निर्णय घेतला जाईल.
- शैलेंद्र सणस, पोलिस निरीक्षक, अलिबाग

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36704 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..