जांभुळपाडा येथे जीर्ण विजेच्या खांबाचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांभुळपाडा येथे जीर्ण विजेच्या खांबाचा धोका
जांभुळपाडा येथे जीर्ण विजेच्या खांबाचा धोका

जांभुळपाडा येथे जीर्ण विजेच्या खांबाचा धोका

sakal_logo
By

पाली, ता. १८ (वार्ताहर) : जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील विजेचा खांब जीर्ण झाला असून तो धोकादायक स्थितीत आहे. हा खांब बदलण्याची मागणी आरोग्य केंद्रातर्फे महावितरणला करण्यात आली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानाला लागूनच हा विद्युत खांब आहे. जीर्ण झालेल्या या खांबाच्या खालच्या बाजूला मोठे छिद्र पडलेले आहे. परिणामी, हा खांब केव्हाही पडून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्‍यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी, रुग्ण व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आहे. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मुळे यांनी जीर्ण झालेल्या धोकादायक विजेच्या खांबाबाबत महावितरण कार्यालयाला कळवण्यात आल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36728 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..