यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खड्ड्यातून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खड्ड्यातून
यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खड्ड्यातून

यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खड्ड्यातून

sakal_logo
By

अलिबाग, ता. १९ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्‍या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसामुळे महामार्गासह, जिल्हा, ग्रामीण भागावरील रस्ते खड्ड्यात गेल्‍याने नागरिक त्रस्त आहेत. गणरायाच्या आगमनाला अवघा दीड महिना राहिला असल्‍याने यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खड्ड्यातून होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यापूर्वी, अलिबाग-पेण, वडखळ-माणगाव व अलिबाग रामराजमार्गे रोहा, अलिबाग-चणेरामार्गे रोहा या रस्त्यांची दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाने केली होती. त्‍यामुळे चालकांसह प्रवासीही समाधानी होते. मात्र जुलै महिन्यात सुरू झालेल्‍या धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्‍कळित झाले आहे.
पावसात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अलिबाग-पनवेल मार्गावरील वडखळपासून तरणखोप या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. कोलाड फाटा ते माणगाव रस्ता, अलिबाग-चणेरामार्गे रोहा, अलिबाग रामराज मार्गे रोहा या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांसह एसटी बस व अन्य वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते पहिल्‍याच पावसात वाहून गेले आहेत. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत प्रवासीवर्गातून संताप व्यक्त होत आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्‍सवात लाखोंच्या संख्येने नागरिक कोकणात जातात. यादरम्‍यान महामार्गावर शासकीय बस, खासगी वाहनांची कायम वर्दळ असते.


राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व ग्रामीण मार्गावरील खड्ड्यांमुळे दर वर्षी चाकरमान्यांना गणेशोत्‍सवात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्‍त्‍यांची तात्‍पुरती डागडुजी करण्यात येत असल्‍याने एकाच पावसात त्‍यांची पुन्हा चाळण होते. त्‍यामुळे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन चाकमान्यांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसेच कामाचा दर्जा आणि योग्य नियोजन करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले आहे.
- डॉ. महेंद्र कल्याणकर,
जिल्हाधिकारी, रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36732 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..