नागाव समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्‍लंघन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागाव समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्‍लंघन
नागाव समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्‍लंघन

नागाव समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्‍लंघन

sakal_logo
By

अलिबाग, ता. १९ (बातमीदार) ः समुद्रकिनारी अनधिकृत बांधकामांमुळे पर्यटनस्थळ धोक्यात येऊ लागले असून पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नागाव समुद्रकिनारी खुलेआम अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत न्यायालयात तक्रार दाखल केली असून सीआरझेडचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून १५ जणांविरोधात नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.

अलिबाग तालुक्यातील नागाव हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. नैसर्गिक वरदान लाभलेला समुद्र किनारा, नारळी पोफळीच्या बाग, किनाऱ्यालगत सुरूच्या झाडांचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. वीकेण्ड तसेच सुटीच्या दिवशी याठिकाणी मोठ्‌या संख्येने पर्यटक येतात. तसेच येथील वेगवेगळ्‌या सागरी खेळांचा आनंद घेतात.
वर्षभरात जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक पर्यटक नागाव समुद्रकिनारी येतात. नागावमध्ये पर्यटकांची वर्दळ वाढल्‍याने स्थानिक व्यवसायिकांना रोजगार मिळत आहे. हॉटेल, कॉटेज, समुद्र किनाऱ्यांमुळे नागावच्या पर्यटन वाढीला चालना मिळत आहे. मात्र याठिकाणी वाढत असलेल्‍या अनधिकृत बांधकामामुळे नागावचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
सीआरझेडचे उल्लंघन करीत काही धनदांडगे, समुद्रकिनारे मोठ मोठे बंगले बांधत आहेत. अनेकदा नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले जात असल्‍याचे समोर आले आहे. नागाव समुद्रकिनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर याप्रकरणी तलाठ्यांकडूनही उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अनधिकृतपणे बांधकाम केल्‍याप्रकरणी सहा जणांविरोधात अलिबाग येथील न्यायालयात मुख्य दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सीआरझेडचे उल्लंघन केल्याबाबत अलिबाग येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात १५ जणांविरोधात अहवाल पाठविण्यात आले आहे. या अहवालाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्या मार्फत चौकशी सुरू असून अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नागावमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. येथील समुद्रकिनारी काही धनदांडग्यांकडून अनधिकृत बांधकाम केले जात आहे. याप्रकरणी आलेल्या तक्रारी व अहवालानुसार, बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांची चौकशी सुरू केली आहे. तसेच सहा जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
- प्रशांत ढगे, उपविभागीय अधिकारी, अलिबाग

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36736 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..