राज्यात शेकाप पुन्हा गतवैभव प्राप्त करेल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात शेकाप पुन्हा गतवैभव प्राप्त करेल!
राज्यात शेकाप पुन्हा गतवैभव प्राप्त करेल!

राज्यात शेकाप पुन्हा गतवैभव प्राप्त करेल!

sakal_logo
By

अलिबाग, ता. २० (बातमीदार) : शेकापला घेतल्याशिवाय रायगड जिल्ह्याचे राजकारण शक्यच नाही. फक्त आणि फक्त कपटनितीमुळेच शेकापचा पराभव झाला. मात्र, संघटना कधीच संपत नसते. पक्षातून अनेक जण गेले; पण आजही पक्ष खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शेकाप गतवैभव प्राप्त करेल, असा विश्‍वास शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केला.
शेकापच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सहाण बायपास येथील सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील प्रमुख पक्ष हा शेकाप आहे. कार्यकर्त्यांना कसलेही शिवबंधन नाही, बाँड नाही, सत्ता नाही. तरीदेखील कार्यकर्ते ठाम असणारा शेकाप आहे. निवडणुकीतील पराभव माझा नाही, तर संघटनेचा झाला आहे. त्यासाठी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. असंख्य प्रसंग आले तरी आपण डगमगलो नाही. लोकशाही आहे, त्यामुळे जय पराजय येत असतात. मात्र ''बचेंगे तो और भी लढेंगे'' या उर्मीने आपल्याला पुन्हा उभे रहायचे आहे, असेही पंडित पाटील म्हणाले.
या वेळी शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेश खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, संजय पाटील, देवेंद्र पाटील, जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, तालुका चिटणीस अनिल पाटील, अ‍ॅड. गौतम पाटील, अ‍ॅड. सचिन जोशी, जिल्हा परिषद माजी सदस्या चित्रा पाटील, संतोष जंगम, माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, शहर चिटणीस अशोक प्रधान, पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष विक्रांत वार्डे, नंदकुमार मयेकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36757 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..