वीज कंपनीला कोट्यवधींचा शॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज कंपनीला कोट्यवधींचा शॉक
वीज कंपनीला कोट्यवधींचा शॉक

वीज कंपनीला कोट्यवधींचा शॉक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २१ : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून वीज वितरण कंपनीचे १ कोटी ७७ लाख रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दहाहून अधिक दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत झाला होता. उच्चदाबाच्या २९, तर लघुदाबाच्या ७७ किलोमीटरपर्यंत अशा एकूण १०६ किमीच्या वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहे. यासाठी महापारेषणच्या १ हजार ९०० कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न घेत वीज पूर्ववत करत आहेत.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. वादळीवारा आणि मुसळधार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून वीज कंपनीचे ९४ रोहित्रांचे नुकसान झाले होते. तर पनवेल तालुक्यातील एक डीपी कोसळली होती. याशिवाय विजेचे खांब मोडणे, अर्धवट वाकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले. दहा ते पंधरा दिवस वीजपुरवठा खंडीत झाल्याने येथील नागरिकांना अंधारात राहावे लागल्याने संतापाचे वातावरण होते. रोहा येथे सोमवारी संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले होते. अशाच प्रकारे अलिबाग, मुरूड, माणगाव येथील नागरिकांनीही आपला असंतोष जाहीर केला होता. यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याचा दबाव वीज वितरण कंपनीवर सातत्याने वाढत होता. अतिवृष्टीमध्ये उच्चदाबाच्या २९.२५ कि.मी.च्या वीजवाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. तर लघुदाबाच्या ७७.६८ किलोमीटर वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसातच वीज वितरण कंपनीचे दीड हजार कर्मचारी आणि ४०० अभियंते दिवस-रात्र मेहनत घेत होते, असा दावा करण्यात येत आहे. पावसाने उघडीप घेतल्यानंतर दुरुस्तीची कामे वेगाने सुरू झाली आहेत.

***
झालेले नुकसान
मोडलेले खांब
उच्चदाब - ८८
लघुदाब- २७९

वाकलेले विजेचे खांब
उच्चदाब - १५३
लघुदाब- २९८

वीजवाहिन्या
उच्चदाब- २९.२५ कि.मी
लघुदाब - ७७.६८ कि.मी
***
कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर वीजपुरवठा सुरळीत होत आहे. काही दुरुस्तीची कामे शिल्लक आहेत, ती लवकरच पूर्ण होतील. पावसाचे प्रमाणच जास्त होते. त्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. यातून मार्ग काढत वीजपुरवठा पूर्ववत केले जात आहे.
- आय. यू. मुलाणी, अधीक्षक अभियंता, पेण मंडळ

---------------------

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36761 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top