स्वयंचलित यंत्राद्वारे किनाऱ्याची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वयंचलित यंत्राद्वारे किनाऱ्याची स्वच्छता
स्वयंचलित यंत्राद्वारे किनाऱ्याची स्वच्छता

स्वयंचलित यंत्राद्वारे किनाऱ्याची स्वच्छता

sakal_logo
By

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. २४ ः समुद्रकिनाऱ्यांवर होत असलेल्या कचऱ्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. प्लास्‍टिक बाटल्या, मलमुत्रासह कचऱ्यामुळे किनाऱ्यावरील प्रदूषण वाढण्याची भीती असल्‍याने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतला आहे. आता किनाऱ्यावर स्वच्छता राखण्यासाठी स्वयंचलित यंत्राचा आधार घेतला जाणार आहे. रायगड जिल्ह्यात हे स्वयंचलित यंत्र दाखल झाले असून येत्या सोमवारी त्‍याचे लोकार्पण सोहळा होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, मांडवा, काशीद, आवास, किहीम, मुरूड, रेवदंडा, दिवेआगर, नागाव, आक्षी, श्रीवर्धन, वरसोली अशा अनेक समुद्रकिनारे आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद पर्यटक मनमुरादपणे घेत असतात. समुद्रकिनारी बनाना बोटीतून सागरी खेळाचा आनंद लुटतात. पर्यटन वाढीमुळे किनाऱ्यावरील खाद्य पदार्थांपासून वेगवेगळ्या वस्तू विक्रीचे स्टॉलधारकांना रोजगाराचे साधन खुले होत आहे. किनाऱ्यावरील सुशोभीकरणामुळे सागरी पर्यटनाला चालना मिळू लागली आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटकांसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील, राज्यातील, देश, विदेशातील पर्यटक आकर्षित होत आहेत.
वीकेंडसह सुटीच्या दिवशी पर्यटकांची या समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड गर्दी होत आहे. मात्र जिल्ह्यातील काही समुद्रकिनाऱ्यांवर पडलेला कचरा, प्लास्‍टिक बाटल्या आदींमुळे किनाऱ्याचे सौंदर्य बाधित होत आहे. किनारी भागात उंट, घोड्यांचे मलमूत्र यामुळे किनारे अस्वच्छ दिसून येत आहेत. अस्वच्छतेमुळे पर्यटकही नाराज असतात. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यवसायांवरही होण्याची शक्‍यता आहे.
जिल्ह्यातील पर्यटन वाढीला चालना देणे, स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. तसेच किनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतला आहे. किनाऱ्याच्या स्‍वच्छतेसाठी स्वयंचलित यंत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36789 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..