कर्जत रेल्वेस्थानक समस्यांच्या गर्तेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत रेल्वेस्थानक समस्यांच्या गर्तेत
कर्जत रेल्वेस्थानक समस्यांच्या गर्तेत

कर्जत रेल्वेस्थानक समस्यांच्या गर्तेत

sakal_logo
By

कर्जत, ता. २५ (बातमीदार) : कर्जत रेल्वेस्थानकात गळणारे छत, अस्वच्छता, गर्दुल्ले यांसारख्या अनेक समस्या प्रवाशांना भेडसावत आहेत. सध्या तरी फलाटांवरील शेडची दुरवस्था झाल्याने त्यातून पाणीगळती होती आहे. परिणामी, प्रवाशांना फलाटांवरही छत्रीचा वापर करावा लागत आहे. अशा अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या रेल्वे स्थानकाची यातून सुटका करावी आणि किमान छताची तरी दुरुस्ती करावी, अशी मागणी रेल्वे पॅसेंजरने केली आहे.
रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर पादचारी पुलासमोरच मोठ्या प्रमाणात छतातून पाणीगळती होत आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांवर पाण्याचा शिडकावा होत आहे. परिणामी, फलाटावरही प्रवाशांना छत्री उघडून ये-जा करावी लागत आहे. याबाबत रेल्वे पॅसेंजर असोशिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असून, त्वरित दुरुस्तीची मागणीही केली आहे. मागील आठवड्यात टाकीतील पाणीच संपल्याने फलाटावरील प्रसाधनगृह दिवसभर बंद होते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. फलाटाला जोडणाऱ्या पादचारी पुलांवर रात्री, तर कधी दिवसाही गर्दुल्ले, भिकारी अस्ताव्यस्त जिन्यात झोपलेले असतात. त्‍यामुळे घाई गर्दीत त्यांना ओलांडत वाट काढणे प्रवाशांना अवघड होते. तसेच रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पुलाखाली फलाटावर येण्याच्या अगोदर असलेल्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यात पाणी चिखल साचल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी रेल्वे पॅसेंजर असोशिएनकडून होत आहे.
----------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36793 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top