वायरमनवर वीज बिल वसुलीचा अतिरिक्‍त भार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायरमनवर वीज बिल वसुलीचा अतिरिक्‍त भार
वायरमनवर वीज बिल वसुलीचा अतिरिक्‍त भार

वायरमनवर वीज बिल वसुलीचा अतिरिक्‍त भार

sakal_logo
By

अलिबाग, ता. २५ (बातमीदार)ः महावितरणकडून जिल्ह्यात वीज बिल थकबाकीदारांविरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. बिल न भरल्‍यास पुरवठा खंडित केला जात आहे. मात्र खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्याची कामे कर्मचाऱ्यांना करावी लागत असून त्‍यांच्यावर वीज बिल वसुलीचा भारही सोपवण्यात आल्‍याने वायरमन त्रस्त आहेत.
शहरी भागासह ग्रामीण भागात विजेचा वापर वाढल्याने वीज सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवताना यंत्रणेची दमछाक होते. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे वीजवाहिन्या तुटणे, खांब कोलमडणे, रोहित्र खराब होणे अशा अनेक घटना घडल्या. त्यामध्ये महावितरणचे जवळपास एक कोटी ७७ लाख रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी कामाला लागले आहेत. मात्र जिल्ह्यातील काही सेक्शनमध्ये कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच वीज बिल थकीत ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. रात्रीचा दिवस करून वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर पुन्हा वीज बिल थकविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी हे कर्मचारी जात आहेत. कामाचा ताण वाढल्‍याने वायरमन त्रस्त आहेत.

ज्या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. कामाचा भार जास्त पडला असेल त्या सेक्शनमधील संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत पर्यायी कर्मचारी उपलब्‍ध करावेत.
- आय. ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता, महावितरण

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36809 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top