आपटवणे शाळेत आरोग्यविषयक जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपटवणे शाळेत आरोग्यविषयक जनजागृती
आपटवणे शाळेत आरोग्यविषयक जनजागृती

आपटवणे शाळेत आरोग्यविषयक जनजागृती

sakal_logo
By

पाली, ता. २७ (वार्ताहर) : विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व कळावे, यासाठी दि प्राईड इंडिया या संस्थेने आपटवणे शाळेत आरोग्यविषयक जनजागृती केली. या वेळी संस्थेने हायजेनिक कीटचे वाटप केले. तसेच ग्रामस्थ व पालकांसाठी मजबूत आणि टिकाऊ जम्बो पिशव्यांचेही वाटप करण्यात आले. घरात व गावात होणारा कचरा पिशवीत टाकल्याने सर्वत्र स्वच्छता राहील आणि ग्रामस्थांना स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल करता येईल, हा या मागील उद्देश होता. कार्यक्रमाला आपटवणे सरपंच शरद चोरघे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैशाली केदारी, सदस्या नेहा भिसे, मयुरी दंत व सारिका दंत उपस्थित होत्या. शिक्षक राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर मुख्याध्यापिका प्रमिला म्हात्रे यांनी संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर वसंत मोरे आणि उपक्रमशील शिक्षिका रजनी राऊत यांचे आभार मानले. यावेळी सरपंच शरद चोरघे यांनी शाळेला फरशी बसवण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36828 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..