
कर्जतमधील शाळांमध्ये जवानांसाठी राख्या
कर्जत, ता. २७ (बातमीदार) : आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशातील नागरिकांची सुरक्षा जपणाऱ्या जवानांना अधिक बळ मिळावे आणि त्यांची सुरक्षा व्हावी, या उद्देशाने कर्जतमधील शाळांमध्ये कर्जत माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने जवानांसाठी राख्या बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात विद्या विकास मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कर्जत विद्या विकास मंदिराच्या विद्यार्थ्यांनी स्नेहबंधनाच्या राख्या पाठवत पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी व आरोग्यासाठी आणि त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी करत असलेल्या त्यागाच्या भावना सुंदर शब्दांत पत्रामध्ये लिहिल्या आहेत. या स्तुत्य उपक्रमासाठी शाळेच्या कार्याध्यक्षा मीना प्रभावळकर, शाळेच्या मुख्याध्यपिका स्नेहा गाढे, पर्यवेक्षिका श्रद्धा मुंढेकर यांच्यासह सर्व शिक्षिकांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. कर्जत माहेश्वरी महिला मंडळाच्या कविता राठी यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले .
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36843 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..