ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचाली सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचाली सुरू
ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचाली सुरू

ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचाली सुरू

sakal_logo
By

अलिबाग, ता. २७ (बातमीदार) : जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकर होण्याची शक्यता आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २९ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्थानिक पातळीवरून तालुका, उपविभागीय व जिल्हा स्तरावर हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबागसह १५ पंधरा तालुक्यांतील २६० ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम रखडला होता. अखेर या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून आरक्षणाचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये २९ जुलैच्या कालावधीत विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप, प्रभाग रचनेवर आरक्षण सोडत काढणे. १ ऑगस्टच्या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे, १ ते ३ ऑगस्ट दरम्यान प्रभागनिहाय आरक्षण निश्‍चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे, १० ऑगस्टमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे, १२ ऑगस्टमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता देणे, १७ ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देणे ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.

विभागनिहाय ग्रामपंचायती
अलिबाग तालुक्यातील ९, मुरूडमधील ५, पेणमधील २७, पनवेलमधील ११, रोहामधील पाच, सुधागडमधील १४, माणगावमधील २२, तळामधील एक, महाडमधील ७८, पोलादपूरमधील २०, श्रीवर्धनमधील १४, म्हसळामधील १३, उरणमधील १५, कर्जतमधील ९, खालापूरमधील १८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36855 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top