
रस्ता दुरुस्तीसाठी एकवटले महाजने ग्रामस्थ
अलिबाग, ता. ३१ (बातमीदार)ः अलिबाग तालुक्यातील बेलोशी-महाजने मार्गावर पावसामुळे खड्डे पडले. या रस्त्यावरून प्रवास करताना त्रास होऊ नये, यासाठी महाजने येथील ग्रामस्थ रस्तादुरुस्तीसाठी एकवटले. त्यांनी सुमारे एक किमी अंतराचा रस्ता मातीचा भराव तयार केला.
बेलोशी-महाजने हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून अपघातांची शक्यता आहे. या रस्त्यावरून एसटीसह अनेक वाहने धावत असून शालेय विद्यार्थ्यांची वर्दळही याच मार्गावरून सुरू असते.
येत्या ३१ ऑगस्ट रोजी घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. खड्ड्यांचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महाजने ग्रामस्थांनी पुढाकार घेत रविवारी एकत्र येत खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात केली. हातात फावडे, टिकाव, घमेल घेऊन माती, खडीमार्फत खड्डे बुजविण्याचे काम केले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, झुडपे साफ करून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला.
छायाचित्र ः समीर मालोदे
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36900 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..