मजरे जांभुळपाडा येथील तरुणाचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मजरे जांभुळपाडा येथील तरुणाचा बुडून मृत्यू
मजरे जांभुळपाडा येथील तरुणाचा बुडून मृत्यू

मजरे जांभुळपाडा येथील तरुणाचा बुडून मृत्यू

sakal_logo
By

पाली, ता. ३१ (वार्ताहर)ः सुधागड तालुक्यातील मजरे जांभूळपाडा येथील तरुणाचा शेतावरील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. रवींद्र मालुसरे (२०) हा तरुण चरायला सोडलेली गुरे आणण्यासाठी शेतावर गेला होता. यावेळी विहिरीत पोहण्यासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्‍याने २५ ते ३० फूट खोल पाण्यात बुडाला. गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र विहीर खोल असल्याने शक्य झाले नाही. घटनेची खबर मिळताच पाली पोलिस व कोलाड रिव्हर राफ्टिंगचे प्रमुख महेश सानप यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. एक ते दीड तासांच्या प्रयत्‍नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36908 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..