जिल्ह्यात आज शेकापचे शक्तीप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात आज शेकापचे शक्तीप्रदर्शन
जिल्ह्यात आज शेकापचे शक्तीप्रदर्शन

जिल्ह्यात आज शेकापचे शक्तीप्रदर्शन

sakal_logo
By

अलिबाग, ता. १ (बातमीदार) ः शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन मंगळवारी (ता. २) जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे. यंदा पेणमधील वडखळ येथे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार असून जिल्हाभरातून तीस हजारांहून अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्‍थित राहणार आहेत. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेकापचे शक्तिप्रदर्शन होणार आहे.
शेकापचा वर्धापनदिन म्हणजे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी वैचारिक मेजवानी असते. यामुळे तळागाळातील कार्यकर्ता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतो. यंदाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत महिन्याभरापासून जिल्ह्यातील तालुका, गाव स्तरावर कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी सर्व तालुक्यांत जिल्हा चिटणीस मंडळाच्या पदाधिकाऱ्‍‌यांचा दौरा काढण्यात आला. दौऱ्याच्या माध्यमातून घराघरांत शेतकरी कामगार पक्ष पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंगळवारी होणाऱ्‍‌या सोहळ्यात आमदार जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, शेकापचे कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील, शेकापच्या वेगवेगळ्या सेलचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36918 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..