नागेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी
नागेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी

नागेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आवास येथील श्री नागेश्वर मंदिरात श्रावणातील पहिला सण नागपंचमीनिमित्त २५ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.
आवासचे सरपंच अभिजित राणे, उपसरपंच पूजा राणे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी आठ दिवस मेहनत घेऊन नागपंचमीच्या उत्‍सवाची तयार केली होती. वाहतूक कोंडी तसेच कायदा सुव्यवस्‍था अबाधित राहावी, यासाठी मांडवा सागरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजीव पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पहाटे तीन वाजल्‍यापासून भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरातील मिठाई, हार व इतर दुकानेही सजली होती. दिवसभर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागपंचमी निमित्त नागेश्वर मंदिरात खारेपाट, अलिबाग तालुका, उरण-करंजा, नवी मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध ठिकाणाहून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. तसेच आगरी-कोळी समाजातील सर्व स्तरांतील भाविकांनी व लोकप्रतिनिधींनी दर्शनाचा लाभ घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36946 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top