प्रत्येक बूथमधील १० घरांवर तिरंगा फडकविण्याचा प्रयत्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्येक बूथमधील १० घरांवर तिरंगा फडकविण्याचा प्रयत्‍न
प्रत्येक बूथमधील १० घरांवर तिरंगा फडकविण्याचा प्रयत्‍न

प्रत्येक बूथमधील १० घरांवर तिरंगा फडकविण्याचा प्रयत्‍न

sakal_logo
By

कर्जत, ता. ७ (बातमीदार) ः आपण घरातील प्रिय व्यक्तीचा वाढदिवस जसा साजरा करतो, त्याप्रमाणे देशाचा ७५ वा वाढदिवस साजरा करू या. आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बूथ सक्षम करण्यास सांगितले आहे. त्‍यानुसार कार्यकर्त्यांनी बूथमधील दहा घरांवर तिरंगा लावण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून मदत करावी. त्‍यानिमित्त तळागाळातील समस्‍याही जाणून घेता येतील आणि त्‍या सोडविण्याकडे लक्ष देता येईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूरेश नेटकर, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, सुनील गोगटे,  संजय कराळे, वसंत भोईर, दीपक बेहेरे, नगरसेवक बळवंत घुमरे, विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, बिनिता घुमरे, माजी नगरसेवक अरविंद शेलार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37000 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..