नाशिकमध्येही ‘स्‍वप्नातील गावे’ विकसित करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिकमध्येही ‘स्‍वप्नातील गावे’ विकसित करणार
नाशिकमध्येही ‘स्‍वप्नातील गावे’ विकसित करणार

नाशिकमध्येही ‘स्‍वप्नातील गावे’ विकसित करणार

sakal_logo
By

पाली, ता. ७ (वार्ताहर) ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वदेस फाऊंडेशनमार्फत रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड, पोलादपूर, महाड, माणगाव, तळा, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील ७५ स्वप्नातील गावे ग्रामविकास समितीच्या पुढाकाराने तयार करण्यात येत आहेत. त्‍या अनुषंगाने कामांचा आढावा व माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी सुधागड तालुक्यामधील कवेलेवाडी व भावशेत ठाकूरवाडी व तळा तालुक्यातील वावे हवेली या गावांना नुकतीच भेट दिली. रायगड जिल्‍ह्याप्रमाणेच नाशिकमध्येही गावांचा विकास करणार असल्‍याचा विश्‍वास या वेळी अभ्‍यास दौऱ्यातील अधिकाऱ्यांकडून व्यक्‍त करण्यात आला.
नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेसी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इगतपुरी, त्र्यंबकेश्वर पेठ व सुरगाणा तालुक्यातील २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या स्वप्नातील गावांना भेट देऊन तेथे स्वदेस फाऊंडेशन, गाव विकास समिती व शासन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या कामांचा अभ्यास केला.
सुधागड तालुक्यामधील कार्यक्रमात तहसीलदार दिलीप रायन्नवार, गटविकास अधिकारी विजय यादव, सहायक गट विकास अधिकारी अशोक महामुनी व पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे उपस्थित होते. वावे हवेली येथील कार्यक्रमांमध्ये महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, सरपंच, ग्रामसेवक गाव विकास समितीचे सदस्य व ग्रामस्थ सहभागी होते.
रायगड जिल्ह्याप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातही स्वप्नातील गाव तयार करण्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे अभ्‍यास दौऱ्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दौऱ्यामध्ये स्वदेस फाऊंडेशन नाशिक येथील व्यवस्थापक मनोज आहिरे, योगेश तोत्रे, संदीप देवमोरे, दीपक गिऱ्हे व गणेश थोरात सहभागी होते. कवेलेवाडी भावशेत ठाकूरवाडी व वावे हवेली या स्वप्नातील गावांमधील गाव विकास समितीमधील सदस्य व स्वदेस व्यवस्थापक शिवदास वायल, समीर शेख, रवींद्र राऊत व संदीप देवमोरे यांनी हा दौरा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

गावांतील विकासकामांवर भर
गावांमध्ये स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर व स्वावलंबी या घटकांवर आधारित ६३ प्रकारची कामे करण्यात येत आहेत, याविषयी गाव विकास समितीकडून माहिती घेत प्रत्यक्ष कामांची पाहणी केली. तसेच सुधागड तालुक्यातील भावशेत ठाकूरवाडी व तळा तालुक्यातील वावे हवेली या स्वप्नातील गावांतील विकासकामांचे उद्‌घाटन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37010 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..