दांड आदिवासी वाडीतील विद्युत खांब धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दांड आदिवासी वाडीतील विद्युत खांब धोकादायक
दांड आदिवासी वाडीतील विद्युत खांब धोकादायक

दांड आदिवासी वाडीतील विद्युत खांब धोकादायक

sakal_logo
By

पाली, ता. ९ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील दांड आदिवासी वाडी येथील लोखंडी विद्युत खांब खालच्या बाजूस गंजून त्याला छिद्र पडले आहे. त्यामुळे तो कधीही कोसळू शकतो. धोकादायक खांब बदलण्याची मागणी वारंवार करूनही वीज महावितरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
मागील आठवड्यात सुधागड तालुक्यातील भार्जेवाडी येथे असाच गंजलेला व जीर्ण झालेला विद्युत खांब पहाटे कोसळला होता. याठिकाणी उपस्थित एक माणूस थोडक्‍यात बचावला होता. यामुळे वीज वाहिन्या तुटून गावाचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. अशी अवस्था दांड आदिवासी वाडीची होऊ नये, यासाठी ग्रामस्थांकडून धोकादायक विद्युत खांब वेळीच बदलण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे.

विद्युत खांब धोकादायक झाला असून याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा वीज महावितरण कार्यालयाकडे तक्रार केली आहे. मात्र दखल घेण्यात आलेली नाही. हा विद्युत खांब पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
- शंकर पवार, ग्रामस्थ, दांड आदिवासी वाडी

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37012 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..