नागोठणेत धर्म फेरीचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागोठणेत धर्म फेरीचे आयोजन
नागोठणेत धर्म फेरीचे आयोजन

नागोठणेत धर्म फेरीचे आयोजन

sakal_logo
By

नागोठणे, ता. ८ (बातमीदार) : नागोठणे येथे हिंदू जनजागृती मंचच्या वतीने रविवारी (ता. ७) धर्म फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या धर्म फेरीत शेकडो तरुण-तरुणीं सहभागी झाले होते.
हिंदू जनजागृती मंचाचे अध्यक्ष योगेश ठाकूर व समिती सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे पूजन करून नागोठणे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सकाळी साडे दहा वाजता फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर ही धर्म फेरी हर हर महादेव, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, वंदे मातरम अशा जयघोषात बाजार पेठ, खुमाचा नाका, गांधी चौक, जोगेश्वरी माता मंदिर, ग्रामपंचायत मार्गाने पोलिस ठाण्याकडे निघाली. या ठिकाणी हिंदू जनजागृती मंचच्या वतीने पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. धर्म फेरीची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता झाली. यावेळी देशासाठी वीर मरण आलेले जवान तसेच दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37031 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..