नुकसान भरपाई अडकली लालफितीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसान भरपाई अडकली लालफितीत
नुकसान भरपाई अडकली लालफितीत

नुकसान भरपाई अडकली लालफितीत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत ७० टक्के पाऊस पडला असून वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली. जिल्ह्यात एकूण २९ घरे पूर्णतः कोसळली असून ३८४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. बाधितांना द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाला चार कोटींची गरज आहे. मात्र, नुकसान भरपाईचा प्रस्ताव अद्याप लालफितीत अडकल्‍याने नागरिक लाभापासून वंचित आहेत.
उरण तालुक्यातील जांभूळपाडा आदिवासीवाडी येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, तर पेण तालुक्यातील पाडले येथील जखमी झालेल्या एका व्यक्तीला चार हजारांची मदत शासनाच्या वतीने देण्यात आली आहे; मात्र, मुसळधार पावसाने पडझड झालेल्या नागरिकांना अद्याप एक रुपयाचीही सरकारच्या वतीने देण्यात न आल्याने या संकटग्रस्त नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला नाही, परंतु समुद्राला आलेले उधाण, वादळी वाऱ्याने घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली. दोन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील नुकसानग्रस्त नागरिकांना एका महिन्याच्या आतच मदतीचे वाटप सुरू झाले होते. त्यामुळे त्यांना घरांची डागडुजी वेळेत करता आली होती. यंदाच्या पावसात झालेल्या नुकसानीचा अद्याप थांगपत्ताच नाही, ही मदत केव्हा मिळणार या प्रतीक्षेत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त नागरिक आहेत.

यंदाच्या पावसात नुकसानीचे प्रमाण कमी आहे. ज्या नागरिकांचे नुकसान झालेले आहे, त्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. शासनाच्या आपत्ती निवारण निकषानुसार, अहवाल तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड

उरण तालुक्यात मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीला आणि जखमी झालेल्या पेण तालुक्यातील एका व्यक्तीला आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. निधी मंजूर झाल्यानंतर लगेचच वाटप सुरू होईल.
- विशाल दौंडकर, तहसीलदार, सामान्य प्रशासन

आतापर्यंत झालेले नुकसान
* पूर्णतः पडलेली पक्की घरे- ६
* पूर्णतः पडलेली कच्ची घरे- २३
* अंशतः पडलेली पक्की घरे- २२८
* अंशतः पडलेली कच्ची घरे- १५६
* पोल्ट्री शेडचे नुकसान - २
* पडझड झालेल्या झोपड्या- ६
* बाधित गोठ्यांची संख्या-६१
* जीवितहानी- १
* जखमी व्यक्ती-१
* पशुधनाची हानी (मोठी जनावरे) - १६
* लहान जनावरे - ४४
* सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान - २१

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37043 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..