बहिणभाऊ रमले व्यवसायात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहिणभाऊ रमले व्यवसायात
बहिणभाऊ रमले व्यवसायात

बहिणभाऊ रमले व्यवसायात

sakal_logo
By

प्रमोद जाधव ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० ः उच्चशिक्षित असताना नोकरीवर विसंबून न राहता स्वतःच्या व्यवसायातून आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न अलिबाग तालुक्यातील वावे येथील बहिण-भावाने केला आहे. अगरबत्ती व्यवसायातून ते वर्षाला लाखोंची उलाढाल करीत आपले रेशमी बंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्‍न करीत आहेत.
गितेश सुधीर पाटील असे या भावाचे नाव असून हितेश्री असे बहिणीचे नाव आहे. गितेशचे मॅकेनिकल इंजिनिअरचे शिक्षण झाले असून हितेश्रीने वनस्पती शास्त्र विषयातून बीएससीचे शिक्षण पूर्ण केले आहे. गितेश गेली काही वर्षे नामांकित कंपनीत नोकरीला होता; परंतु नोकरी न करता स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग व्यवसायासाठी करण्याचा निर्धार त्‍याने केला आणि बहिणी-भावाने मिळून अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय केला. आई-वडिलांचे छत्र हरविले असतानाही दोघांनी खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहून २०१७ पासून वावे या ठिकाणी अगरबत्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला.
पाच वर्षांपासून त्‍यांचा व्यवसाय सुरू असून ते स्थानिक दुकानदारांसह संपूर्ण तालुक्‍यात होलसेलच्या दरामध्ये अगरबत्ती विकतात; सण-उत्‍सवात यांच्याकडील अगरबत्तीला मोठी मागणी असून वर्षाला सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांची व्यवसाय ते करतात. आई-वडिलांच्या पश्‍चात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत या बहीण-भावाने समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

पाच वर्षांपासून आम्ही बहिण-भाऊ अगरबत्ती व्यवसाय करीत आहोत. अगरबत्ती तयार करण्यापासून ते विक्रीपर्यंतचे काम दोघे करतो. या व्यवसायातून चांगल्या पद्धतीने आर्थिक उलाढाल होत आहे.
- गितेश पाटील

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37068 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..