शिक्षिकेची ७० दिव्यांतून ओवाळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षिकेची ७० दिव्यांतून ओवाळणी
शिक्षिकेची ७० दिव्यांतून ओवाळणी

शिक्षिकेची ७० दिव्यांतून ओवाळणी

sakal_logo
By

अलिबाग, ता. ११ (बातमीदार)ः गुरूची महती प्राचीन काळापासून जपली जात आहे. आजही याचा प्रत्‍यय येतो. चौथीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षिका ऊर्मिला पराडकर यांची ७० दिव्यांनी ओवाळणी करून वाढदिवस साजरा केला. शिस्‍तप्रिय, उत्तम शिक्षिका म्‍हणून पराडकर विद्यार्थ्यांना विशेष प्रिय होत्‍या. त्‍यामुळे १९९४ या वर्षातील चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्‍या आवडत्या‍या शिक्षकांचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्‍‌या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्‍यासाठी समाजमाध्यमांवर ग्रुप तयार करून नियोजन केले आणि वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी चक्‍क ७० दिव्यांनी पराडकर यांना ओवाळले. त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा केला.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37073 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..