स्वयंचलित यंत्राद्वारे अलिबाग किनारा स्वच्छ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वयंचलित यंत्राद्वारे अलिबाग किनारा स्वच्छ
स्वयंचलित यंत्राद्वारे अलिबाग किनारा स्वच्छ

स्वयंचलित यंत्राद्वारे अलिबाग किनारा स्वच्छ

sakal_logo
By

अलिबाग, ता. ११ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वयंचलित यंत्र दाखल झाले आहे. या यंत्राद्वारे अलिबाग समुद्र किनारी असलेला कचरा, प्लास्‍टिक गोळा करण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, काशीद, श्रीवर्धन अशा अनेक महत्त्वाच्या समुद्र किनारी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे; परंतु किनारी असलेल्या कचऱ्यामुळे व्यवसायावर परिणाम होण्याची भीती अधिक असते. शिवाय पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोकाही अधिक असतो.
पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच समुद्र किनारी असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून किनारे प्रदूषणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रायगड जिल्ह्यासाठी स्वयंचलित यंत्र दिले आहे. यंत्राद्वारे समुद्र किनाऱ्‍‍यावरील कचरा साफ करण्याचे काम सुरू झाले आहे. अलिबाग समुद्र किनारा स्वच्छ करण्याचे काम यंत्राद्वारे करण्यात आले असून किनाऱ्‍‍यावर साचलेले प्लास्टिक, अन्य कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम केले जात आहे.
सध्या समुद्र खवळला असून लाटांच्या मारामुळे मोठ्या प्रमाणात कचरा किनारी आला होता. त्या कचऱ्यामुळे प्रदूषण होऊ नये म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वयंचलित यंत्राद्वारे समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविली आहे. ज्या कामासाठी अनेक तास लागत होते, ते काम काही तासांतच पूर्ण होत असल्याने समुद्र किनाऱ्यांचे सौंदर्य खुलून दिसण्याच्या मार्गावर आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37074 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..