हव्यासापोटी मित्रालाच लुबाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हव्यासापोटी मित्रालाच लुबाडले
हव्यासापोटी मित्रालाच लुबाडले

हव्यासापोटी मित्रालाच लुबाडले

sakal_logo
By

अलिबाग, ता. ११ (बातमीदार)ः सोन्याच्या हव्यासापोटी मित्रांनी मित्राला लुबाडल्‍याची घटना मांडवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मांडवा सागरी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून मुद्देमाल जप्त केला.
अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथील रोहित रमेश कडवे या तरुणाचा बांधकामाचा व्यवसाय आहे. २ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मित्र योगेश (रा. मांडवा) याच्यासमवेत जेसीबीचे स्पेअर पार्ट व सोन्याचे ब्रेसलेट खरेदी करण्यासाठी नवी मुंबईत कारने गेले होते. योगेशने स्पेअर स्पार्ट व रोहितने वाशीतील ज्वेलर्समधून दोन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट खरेदी केले. त्यानंतर मॉलमधून कपड्यांची खरेदी करून दोघेजण घरी परतत होते.
दरम्यान, रोहितने त्याचा मित्र अक्षयला व्हिडीओ कॉल करून ब्रेसलेट दाखविला. त्यानंतर रोहित व योगेश हे दोघे तीन जुलैला पहाटे एकच्या सुमारास मांडवा दस्तुरी नाका येथे आले. दस्तुरी नाका येथे आल्यावर रोहित त्याच्या दुचाकीवर बसून घरी निघाला; तर योगेश त्याच्या कारमधून घरी गेला. त्यावेळी रोहितला त्याचा मित्र अक्षय रस्त्यात भेटला. विचारपूस केल्यावर तो त्याच्या दुचाकीवरून अलिबागकडे निघून गेला. रोहित मध्यरात्री सुमारे दीडच्या
सुमारास सारळ पुलावरून मिळकतखार मळा येथे आला असता चौघांनी त्‍याला अडवले. त्‍यानंतर त्‍याच्याकडील दोन सोन्याचे ब्रेसलेट, तीन अंगठ्या असा चार लाख ५० हजारांचे दागिने काढून घेतल्या. या वेळी झालेल्‍या झटापटीत एकाच्या तोंडावरील मास्‍क खेचला असता तो गौरव शेळके नावाचा मित्रच असल्याचे दिसून आले. या मंडळींनी रोहितला दुखापत करून पसार झाले. याप्रकरणी मांडवा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक निरीक्षक राजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल शिर्के, महिला उपनिरीक्षक दीपाली खाडे, पोलिस नाईक चेतन म्हात्रे, हवालदार शेख यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू केला. अलिबाग तालुक्यातील झिराड येथील गौरव साळुंखे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सम्राट तोडणकर याला धोकवडे येथून राहत्या घरातून पकडले. तसेच गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराचा शोध सायबर सेलच्या मदतीने घेऊन सारळ येथील अक्षय नाईक व अलिबागमधील गणेश पगारे या दोघांना पनवेल येथील एका लेडीज बारच्या आवारातून ताब्‍यात घेतले.

जिल्‍हा कारागृहात रवानगी
पाचही आरोपींना ताब्‍यात घेतल्‍यावर पोलिसी दणका दाखवताच त्‍यांनी गुन्ह्याची कबुली दिली. लंपास केलेला मुद्देमाल अक्षय नाईक याने घराच्या बाहेर एका खड्ड्यात लपून ठेवला होता. तो पोलिसांनी हस्‍तगत केला. अवघ्या काही तासांत रायगड पोलिस दलातील मांडवा सागरी पोलिसांनी लुटमार करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद केले. सर्वांना पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली असून जिल्हा कारागृहात आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37075 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..