विद्यार्थिनींचा डॉ. किरण पाटील यांच्यासोबत रक्षाबंधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थिनींचा डॉ. किरण पाटील यांच्यासोबत रक्षाबंधन
विद्यार्थिनींचा डॉ. किरण पाटील यांच्यासोबत रक्षाबंधन

विद्यार्थिनींचा डॉ. किरण पाटील यांच्यासोबत रक्षाबंधन

sakal_logo
By

अलिबाग, ता. ११ : तालुक्यातील एसओएस चिल्ड्रन व्हिलेज सोगाव संस्थेतील विद्यार्थिनींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.‌ किरण पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन सण गुरुवारी (ता. ११) साजरा केला. या वेळी डॉ. पाटील यांनी विद्यार्थिनींसोबत मनमोकळा संवाद साधत, त्यांना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. एसओएस चिल्ड्रन व्हिलेज सोगाव व रूरल अॅण्ड यंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. सरस्वती जाधव, तनिष्का कोळी, वैशाली नाईक, मंजुषा वाघमारे, श्रावणी गायकवाड, मनीषा गुप्ता या विद्यार्थिनींनी डॉ. पाटील यांना राखी बांधली. या वेळी संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रेमलता तंगराज, कविता पवार, रूरल अॅण्ड यंग फाऊंडेशन संस्थापक सुशील साईकर उपस्थित होते. घरोघरी तिरंगा मोहिमेबाबत विद्यार्थिनी जनजागृती करणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37083 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..