नेणवली शाळेत ‘सैनिक आपल्या भेटीला’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेणवली शाळेत ‘सैनिक आपल्या भेटीला’
नेणवली शाळेत ‘सैनिक आपल्या भेटीला’

नेणवली शाळेत ‘सैनिक आपल्या भेटीला’

sakal_logo
By

पाली, ता. १३ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील रायगड जिल्‍हा परिषदेच्या नेणवली शाळेत स्‍वातंत्र्याच्या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शुक्रवारी ‘सैनिक आपल्या भेटीला’ या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सैनिकांसोबत मनसोक्त संवाद साधला.
नेणवली ग्रामपंचायत क्षेत्रातील पिंपळोली गावचे सुपुत्र व माजी सैनिक विशाल कळमकर हे विद्यार्थ्यांच्या भेटीला आले होते. विशाल कळमकर हे सैन्यदलात २००२-२०१९ मध्ये कार्यरत होते. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळ, फाळणी, थोर क्रांतिकारकांचे बलिदान यावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीत ते कशाप्रकारे सैन्यात दाखल झाले. त्यासाठी घेतलेली मेहनत, घरची आर्थिक परिस्थिती, त्याचबरोबर प्रशिक्षणामधील विविध पैलू, सैन्य दलातील शिस्तीची माहिती दिली. तसेच मुलांनी मोठे होऊन अधिकारी पदावर जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा तयारी करावी, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्‍यांनी उत्तर दिली.
तालुक्यात तहसीलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे व केंद्रप्रमुख कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. सैनिक आपल्या भेटीला या उपक्रमासाठी नेणवली शाळेचे मुख्याध्यापक संतोष हरपाल, उपशिक्षक राजेंद्र अंबिके व गणपत वरगडे यांनी मेहनत घेतली.

फोटो ओळ, पाली ः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सैनिक विशाल कळमकर, सोबत मुख्याध्यापक व शिक्षक. (छायाचित्र ः अमित गवळे)

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37096 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..