राष्ट्रीय लोकअदालतीतून १७, ५१७ प्रकरणे निकाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय लोकअदालतीतून १७, ५१७ प्रकरणे निकाली
राष्ट्रीय लोकअदालतीतून १७, ५१७ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीतून १७, ५१७ प्रकरणे निकाली

sakal_logo
By

पाली, ता. १४ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. त्यामुळे वादपूर्व व दाखल अशी एकूण १७ हजार ५१७ प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे. तसेच १७ कोटी ६० लाख ५९ हजार १८ रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आल्‍याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित लोकअदालतीमध्ये एकूण ९५ हजार ८२ प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व १५ हजार ९११ व प्रलंबित प्रकरणांपैकी १ हजार ६०६ प्रकरणे अशी एकूण १७ हजार ५१७ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाली.

चौकट
पाच जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले
अलिबाग येथील लोकन्यायालयात पाच जोडप्यांचा ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक पती-पत्नी होते. त्यांच्यातील वाद सामंजस्याने मिटला आहे. त्या पक्षकारांचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. एस. सावंत व पॅनेलवरील न्यायाधीशांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

व्हिडीओ कॉलचा वापर
रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांत ४८ लोकअदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करूनसुद्धा प्रकरणे मिटविण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37131 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..