तीर्थक्षेत्र पालीत भक्तीमळा फुलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीर्थक्षेत्र पालीत भक्तीमळा फुलला
तीर्थक्षेत्र पालीत भक्तीमळा फुलला

तीर्थक्षेत्र पालीत भक्तीमळा फुलला

sakal_logo
By

पाली, ता. १४ (वार्ताहर) ः सलग सुट्ट्यांमुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रविवारी हजारो भाविक पालीत दाखल झाले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतील आणि परराज्यातून भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने पालीत दाखल झाले. गेल्‍या दोन दिवसांपासून भाविकांची गर्दी असल्याने दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांचा धंदा चांगलाच तेजीत आहे. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करीत असल्‍याने आदिवासी महिलांनाही चांगला रोजगार मिळत आहे. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.

वाहतूक कोंडी
शहरात भाविकांची वाहने व अवजड वाहने यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल होती. त्यामुळे अरुंद रस्त्यावरून समोरासमोरून वाहने आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाक्या-नाक्यावर बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच देवस्थानचे सुरक्षा रक्षकदेखील परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते.

सलग सुट्ट्या आल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले आहेत. अनेकांनी चांगली खरेदीदेखील केली. त्यामुळे व्यवसाय तेजीत आहे.
- राहुल मराठे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर मंदिर


देवस्थानचे दोन भक्तनिवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलिंग व निवारा शेड उभारले आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानचे दोन ठिकाणी मोफत पार्किंग आहे. प्रसादालयात नाममात्र शुल्कात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
- जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37135 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..