पालीमधील चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीमधील चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव
पालीमधील चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

पालीमधील चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

sakal_logo
By

पालीमधील चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

पाली, ता. १७ (वार्ताहर) ः पाली शहरातील गुरव आळी व होळीचा माळ येथील चौकाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामांतर करण्यात आले आहे. यासाठी हिंदू जनजागृती समिती, पाली व सामाजिक कार्यकर्ते ओमकार प्रमोद खोडागळे, तसेच गुरव समाजाने नगरपंचायत प्रशासनाकडे अर्ज केले होते. त्यानुसार नगरपंचायत नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी मान्यता दिली. पाली नगराध्यक्षा व सेवानिवृत्त सैनिक अतिष सरनाईक यांच्या हस्ते नामांतर फलकाचे अनावरण करण्यात आले. तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. माजी उपसरपंच संगीता खोडागळे व नगरसेविका जुईली ठोंबरे यांच्यासह अनेक महिलांच्या हस्ते नामफलकाचे पूजन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, तालुका युवासेना अधिकारी किरण पिंपळे, नगरसेवक सुधाकर मोरे, पराग मेहता, सुधीर भालेराव, सुलतान बेनसेकर, विक्रांत चौधरी, नीलेश धारिया आदी उपस्‍थित होते.

फोटो - पाली ः नामफलकाचे मान्यवरांच्या हस्‍ते अनावरण करण्यात आले. (छायाचित्र ः अमित गवळे)

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37180 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..